Posts

काळाच्या पडद्याआड गेलेली ऐतिहासिक भिल्लीणिची वाट अर्थात नांगरदरा घाटवाटा..

Image
   सन २०१७/१८  मध्ये नांगरदरा घाटवाटे बाबत एका what's up ग्रुप वर कुणीतरी विषय छेडला होता. ग्रुप कुठला होता मला आता स्पष्ट आठवत नाही व तेव्हा कुणीतरी फोन करून मला याबाबत विचारणा पण केली होती त्यांचे नाव पण नाव आठवत नाही. तेव्हापासून जुन्नर तालुक्यातील या घाटवाटे बाबत मी माहीती घेण्यासाठी खुपच धडपड केली होती खरी, परंतु कुठेही सुगावा लागेनासा झाला होता.  खडकुंबे, फांगुळगव्हाण, घाटघर, अंजनावळे परीसरातील बहुतांशी बुजुर्ग मंडळींची व गुराख्यांची भेट घेत याबाबत विचारणा केली परंतु शेवटी माझे प्रयत्न असफलच ठरले. शेवटी हार न मानता याबाबत काही धागेदोरे प्रत्यक्ष भटकंती द्वारे हाती लागतात का पाहण्यासाठी ६/७ वेळा अंजनावळे डोंगर माथ्यावर एकट्याने जाऊन शोध घेण्याचा खुप प्रयत्न केला.  मुरबाड तालुक्यातील गावातील जंगल तुडवत ही घाटवाट शोधन सोपं नव्हतं कारण या घाटवाटेची तळातुन सुरुवात सापडणं शक्यच नव्हते व काळाच्या ओघात ती गाडली गेली असणार यात शंकाच नव्हती म्हणून डोंगर घाट माथ्यावरून एखादी घळ खाली पोहचते का हा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी डों...

हरिश्चंद्रगड नळीची वाट

Image
नळीची वाटेने ३:३० तासांत हरिश्चंद्रगड दर्शन तर सादले घाट मार्गे बेलपाडात ८:३० तासांत वापसी ट्रेक कसा करावा वाचा सविस्तर.      नळीच्या वाटेने जायचा बेत आदल्या रात्री टाकळी ढोकेश्वर लेणी व पारनेर चे संगमेश्वर मंदिर पाहून परतीच्या प्रवासात केला होता. सोबत मित्र किरण बाणखेले, विवेक पिंगळे व शशिकांत मडके येणार होते. परंतु या तिघांचे येणे रद्द झाले व मी एकटाच नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडाला जायचा बेत पक्का केला. मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावचे माझे मित्र दिपक विसे यांना फोन केला व आपणास सकाळी नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडाला जायचे आहे म्हणून सांगितले. दिपकने प्रथमदर्शनी नकारच दिला. परंतु माझा जायचा बेत मात्र कुणी येऊ अथवा न येऊ तो पक्काच होता. एकट्याने नळीचा प्रवास करायचाच व शिखर फत्ते करायचेच ठरले होते. हा विचार करत असतानाच तेवढ्यात पुन्हा दिपकचा फोन आला. मी फोन रिसिव्ह केला. दिपक बोलला सर एकाच दिवशी गडावर न राहता खाली येणार असाल तर मी येतो सकाळी सोबतीला. मी पण लागलीच चालेल की म्हटले. माझे पण गडावर न थांबता खाली यायचेच नियोजण होते. मग काय सकाळी ५:२५ ला कल्याण - अहमदनगर राष्ट्रीय...