हरिश्चंद्रगड नळीची वाट
नळीची वाटेने ३:३० तासांत हरिश्चंद्रगड दर्शन तर सादले घाट मार्गे बेलपाडात ८:३० तासांत वापसी ट्रेक कसा करावा वाचा सविस्तर. नळीच्या वाटेने जायचा बेत आदल्या रात्री टाकळी ढोकेश्वर लेणी व पारनेर चे संगमेश्वर मंदिर पाहून परतीच्या प्रवासात केला होता. सोबत मित्र किरण बाणखेले, विवेक पिंगळे व शशिकांत मडके येणार होते. परंतु या तिघांचे येणे रद्द झाले व मी एकटाच नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडाला जायचा बेत पक्का केला. मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावचे माझे मित्र दिपक विसे यांना फोन केला व आपणास सकाळी नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगडाला जायचे आहे म्हणून सांगितले. दिपकने प्रथमदर्शनी नकारच दिला. परंतु माझा जायचा बेत मात्र कुणी येऊ अथवा न येऊ तो पक्काच होता. एकट्याने नळीचा प्रवास करायचाच व शिखर फत्ते करायचेच ठरले होते. हा विचार करत असतानाच तेवढ्यात पुन्हा दिपकचा फोन आला. मी फोन रिसिव्ह केला. दिपक बोलला सर एकाच दिवशी गडावर न राहता खाली येणार असाल तर मी येतो सकाळी सोबतीला. मी पण लागलीच चालेल की म्हटले. माझे पण गडावर न थांबता खाली यायचेच नियोजण होते. मग काय सकाळी ५:२५ ला कल्याण - अहमदनगर राष्ट्रीय...