Posts

Showing posts from October, 2018

खिरेश्वरच्या नेढ्याचा चित्तथरारक अनुभव | A breathtaking experience of Khireshwar Loop | Khireshwar

Image
खिरेश्वरच्या नेढ्याचा चित्तथरारक अनुभव.       जुन्नरहुन आज लवकरच निघालो होतो. त्यामुळे सकाळचे सुर्योदयाचे विहंगम दृश्य पिंपळगाव जोग धरणाच्या पाण्यात सुंदर असे प्रतिबिंब रुपातही पाहायला मिळत होते. अंगाला जाणवणारी सकाळची बोचरी थंडी, जलाशय परिसरात थव्याने विहार करणारे पक्षी, धरणाच्या पाण्याच्या लाटांचा होणारा मंजुळ आवाज व पक्षांच्या गाण्यांचे कानावर ऐकु येणारे मधुर स्वर सर्व काही आनंद देणारे होते.    मी, अक्षय व ओंकार हे दृश्य डोळ्यांमधे साठवत खिरेश्वराकडे चारचाकिमधुन चाललो होतो. हरिश्चंद्र गड रांगेचे चारचाकीच्या समोरच्या काचेतून दिसणारे दृश्य पाहून असे वाटत होते की जणू  ती सिनेरीच काचेवर लावली आहे की काय? खिरेश्वर मध्ये दत्ता बहुर्ले व त्याचा मित्र चिंतामण गाईड म्हणून येणार होते. कारण आजपर्यंत कधीही कुणीही न गेलेल्या अवघड व चित्तथरारक ठिकाणी अनुभव घ्यायला जायचे होते. समोरच चिंतामण चे ऐश्वर्या हाॅटेल होत. हाॅटेल छोटसच परंतू कुटुंबाची उपजिविका यावरच त्याची चालते. माणुसकीला जपणारा चिंतामण चारचाकी पाहताच पळत आला. कारण दत्ताने त्यास सांगितले होते कि आज सर...