अश्मयुगीन जुन्नर तालुका.(बोरी गावची १४ लाख वर्षांपूर्वीची टेफ्रा राख)

अश्मयुगीन जुन्नर तालुका.(बोरी गावची १४ लाख वर्षांपूर्वीची टेफ्रा राख)
    हो मी आज जुन्नर तालुक्याची एक अश्मयुगीन माहिती सांगणार आहे. खरंच जुन्नर तालुका अश्मयुगीन आहे का? हो संशोधकांनी याबाबत पुरावाच दिलाय. अश्मयुग म्हटले की उगाचच इतिहासाची पुस्तके वाचल्याचा भास होतो तो कसा पहा सविस्तर जुन्नर तालुक्यातील वर्णन. मित्रांनो अश्मयुग म्हणजे ऐतिहासिक किल्ला नव्हे की गेलं आणि किल्ला पाहून खाली आलं अशी ती मुळीच जागा नाही. आपल्या महाराष्ट्रातील पुरातत्त्व संशोधकांनी अत्यंत कष्टपूर्वक आणि अभ्यासाने या अशा अश्मयुग सांगणाऱ्या दुर्मिळ जागा शोधून काढल्या, तिथे संशोधन केले. लाखो वर्षांपूर्वीच्या मानवी जीवनाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या या प्रवासाचा एक थांबा म्हणजेच पुण्याजवळील जुन्नर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्ग नारायणगाव पासून 15 किलो मीटर पुर्वेस हे गाव कुकडी नदीच्या तीरावर वसलेले हे बोरी गाव आहे. कुकडी नदीच्या या गावात आदिमानवाची वस्ती सापडेल असे कोणाच्या ध्यानीही नव्हते पण कुकडी प्रकल्पांतर्गत गावाच्या वरच्या बाजूस येडगाव व त्या पाठीमागे माणिकडोह धरणे साकारली आणि कायम राहते असणारे नदीचे पात्र एकदम कोरडे पडले. या उघड्या पात्रातूनच मग या आदिमानवाचा प्रवास सांगणारी सत्यकथा जन्माला आली सन 1987 च्या सोमवाराची ही गोष्ट पुण्याजवळच्या परिसरात भौगोलिक सर्वेक्षण सुरू असतानाच डॉक्टर विश्वास काळे यांना बोरी गावाजवळ कुकडी नदीकाठी एक आगळेवेगळे राखेचे थर आढळले या थरांच्या असामान्यतेबद्दल भू - शास्त्र अभ्यासक निरंजन घाटे यांनीही यापूर्वीच एका लेखातून अंदाज व्यक्त केला होता.नदिकाठाने तब्बल दहा किलोमीटरच्या परिसरात हे थर पसरलेले होते. पण ही राख काही साधीसुधी नव्हती, तर तप्त ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर हवेत उडालेले खनिज, सिलिकांच्या सूक्ष्मकणांचा तो थर होता. कधी काळी कुठेतरी झालेल्या ज्वालामुखीबरोबर हे कण हवेत दूरवर उडाले. पुढे शांत झाल्यावर पृथ्वीच्या परिभ्रमणाचा इथे बोरीत येऊन स्थिरावले. या राखेसारख्या दिसणाऱ्या कणांना भू-शास्त्रीय भाषेत "टेफ्रा" असे म्हणतात आणि असा टेफ्रा पडण्याच्या घटनेला टेफ्रांचा पाऊस पडणे असे म्हणतात. तर मग बोरीत कधी झाला हा टेफ्रांचा पाऊस? पाच-दहा वर्षे, शंभर वर्षे, एक हजार वर्षे.. काहीच कळेना. शेवटी या टेफ्रांच्या काही अवशेषांची तपासणी करून त्याचे वय काढण्याचे ठरले. मग त्यासाठी यातील काही अंश गुजरातच्या अहमदाबाद येथील पदार्थविज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांनी सारे संशोधन विश्वच उडाले. कारण या टेफ्रांचे वय निघाले तब्बल १४ लाख वर्ष. बोरीत टेफ्रांचा पाऊस पडणारा हा ज्वालामुखी कुठला तर बोरी पासून काही हजार किलोमीटर दूर असलेल्या इंडोनेशियातला.  इतक्या जुन्या या टेफ्रांमुळे दुसरीकडे या राखेच्या थराखाली सृष्टीचे अवशेष मिळाले तर ते तितकेच किंवा त्यापेक्षाही जुनी असणार, म्हणजेच आदिमानवाच्या काळातील हेही उघड झाले. ज्यातून या संशोधनास एक वेगळीच चालना आणि दिशा मिळाली. बोरीतील ही परिस्थिती कळताच पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे डॉ. शरद राजगुरू, डॉ. शीला मिश्रा, डॉ. सविता घाटे, डॉ. नितीन करमळकर, डॉ. सुषमा देव, सोनाली नाईक यांच्या नेतृत्वाखाली बोरीत संशोधनास सुरुवात झाली. टेफ्रांचे थर अलगदपणे मोकळे करण्यात आले. आता सापडलेले अवशेष अलगतपणे साफ केले गेले आणि अपेक्षेप्रमाणे ताम्रपाषाणयुगापासून ते अश्मयुगापर्यंतच्या अवशेषांचे एक भांडारच संशोधकांच्या हाती आले. काय काय मिळाले यात. अश्मयुगीन हत्यारे, विविध प्राण्यांचे जीवाश्म रुपी सांगाडे, ज्यामध्ये एका हत्तीचा तब्बल दोन मीटर लांबीचा दात (मध्य पुराश्मयुग), शहामृगाच्या अंड्याचे कवच (अंतिम पुराश्म युग) असा मोठा खजिनाच हाती लागला. सात लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या टेफ्रांचा पाऊस झाला तेव्हा ही सारी जीवसृष्टी त्याखाली गाडली गेली. मृत झाली. पण आता या नव्या संशोधनामुळे  १४ लाख वर्षांपूर्वीचे अस्तित्व पुन्हा एकदा प्रकाशात आले. यापूर्वी मानवाच्या प्राचीन अस्तित्वबाबत आफ्रिकेकड़े पाहिले जायचे, पण बोरीच्या संशोधनाने हा समज दुर केला नाही तर आपल्या जवळ पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मानवाचे अस्तित्व होते हे सिद्ध केले. त्यामुळे भारतातही आफ्रिकेच्या समकालीन मानवी पुरावे मिळु शकतील. याची शक्यता वाढली. कालपरवापर्यंत ज्या गावात कोणीही फिरकत नव्हते त्या गावाचे नाव या संशोधनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. आणि देश- विदेशांतील अनेक अभ्यासक, पर्यटक माहीती घेत बोरीच्या या कुकडी किना-यावर येतात.
         इथले टेफ्रांचे थर आणि त्याखालची संस्कृती पाहता १४ लाख वर्षांपूर्वींच्या मानवी पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न करतात. सहल म्हणजे फक्त एखाद्या थंड हवेच्या किंवा मौजमस्ती च्या ठिकाणी जाणे एवढेच नाही. तर बोरी सारख्या स्थळांना भेट देत आपला भूगोल प्राचीन इतिहास समजून घेणे, त्याच्या अधिक जवळ जाणे, हे देखील आहे. मध्ययुगातील शिवकाळाची पहाट या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी वर झाली. प्राचीन काळातील महाराष्ट्राचा आद्य कुल सातवाहनांचा उदय आणि उत्कर्षही या "जीर्णनगरी" जुन्नरमध्ये झाला आणि आता अगदी थेट अश्मयुगातील मानवाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा या जुन्नर तालुक्यातील "बोरी" गावी मिळाल्या निव्वळ योगायोगच का हा?
     प्रसिद्ध लेखक प्रा.प्र.के घाणेकर यांच्या सोबत दोन दिवस सहवासात याबाबत सविस्तर चर्चा तर झाली व यावेळी त्यांनी मला "सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या..... हे त्यांचे पुस्तक भेट केले. या पुस्तकातील लेख क्रमांक ६६ पेज नंबर १३४ वर या 'टेफ्रा' बाबत महत्त्वपूर्ण लिखाण केले आहे. या लेखाचा आधार घेत वरील लेख लिहीण्याचा केलेला हा एक प्रयत्न आहे.
        टेफ्रा बाबत बोरी ग्रामस्थांनी अमोलजी कोरडे यांच्या प्रयत्नातून व मा.विलासजी वाहने पुरातत्व विभाग, मा.वसंतराव शिंदे कुलगुरू डेक्कन कॉलेज यांचे मार्गदर्शनाने संवर्धन कार्य सुरू केले असून हा अनमोल ठेवा जतन केला जात आहे.
              लेख : श्री. रमेश खरमाळे, शिवनेरी भषण
                                वनरक्षक जुन्नर
                           (माजी सैनिक खोडद)
                           मो.नं. 8390008370
                                  "शिवाजी ट्रेल"
                 फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
   विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता  लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.njunnartaluka

Comments


  1. Great Information.
    Best Tourist Farmhouse stay Near Junnar, Malshe jghat .
    Kokane International Farmhouse.
    kokaneinternational-tourism.blogspot.com
    Call-7977153733

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जुन्नर तहसील के ऐतिहासिक और प्राकृतिक दर्शन| Historical and natural treasure | Junnar

म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी | Mhanswandi and khamundi ghat | Junnar