कोबरा नागाला वाचवुन केली दिवाळी साजरी | Celebrated Diwali by rescuing cobra snake | Junnar
कोबरा नागाला वाचवुन केली दिवाळी साजरी.
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील शेतकरी खंडू मारुती पानसरे यांच्या शेतात तीन दिवसापूर्वी कांदा लागवडीचे काम चालू असताना कांद्याच्या एका वाफ्यात कोबरा प्रजातीचा नाग गेली तीन दिवस बिळामध्ये रुतून बसला होता. याबाबत वडील खंडू मारुती पानसरे यांनी नोकरीला मुंबईला असलेला आपला मुलगा गणेश खंडू पानसरे यास कल्पना दिली होती. मुलगा गावी आला परंतु याबाबत तो विसरून गेला आणि आज अचानकच तीन दिवसानंतर पुन्हा गणेश यास या सर्पा बाबत आठवण झाली. तो सर्पा बाबतची परिस्थिती पाहण्यासाठी कांद्याच्या शेतात गेला असता त्यास त्याठिकाणी अडकलेला सर्प आढळुन आला. सर्पाची परिस्थिती पाहून त्याने फेसबुक फ्रेंड असलेल्या जुन्नर वनविभागात कार्यरत असलेल्या वनरक्षक रमेश खरमाळे यांना फोनवर संपर्क करून सर्प बिळात अडकल्याचे सांगितले. काही क्षणात रमेश खरमाळे आणि प्रवीण खरमाळे त्या ठिकाणी पोहोचले याठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली होती सापाला बिळातून काढण्यासाठी खोदकाम करणे गरजेचे होते. सोबतीला अजून एक सर्प मित्राची गरज होती रमेश खरमाळे यांनी आकाश परदेशी या सर्पमित्राला फोन केला व या दोघांनी कोबरा या प्रजातीच्या सर्पास खोदुन बाहेर काढले दुर्मिळ होत चाललेल्या कोब्रा या प्रजातीच्या नागास जिवदान दिले. रमेश खरमाळे यांनी या नागास त्याच्या अधिवासात नंतर सोडून दिले. यावेळी पिंपळगाव सिद्धनाथ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीसाठी उपस्थित होते.
ऐन दिवाळीत नागोबाचा जिव वाचवुन दिवाळी एक वेगळ्याच प्रकारची साजरी करण्यात आनंद वाटला. गणेश पानसरे यांनी वन्यजीवांचे माहिती देऊन जीवनदान देण्यास ख-या अर्थाने मदत केली. आपणही भविष्यात असे वन्यजीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
नाग बिळात कसा दबला गेला व त्यास कसे बाहेर काढले पहा सविस्तर पुढील लिंकवर https://youtu.be/ZYWYpnUZoic
छायाचित्र - श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक)
शिवनेरी भुषण
८३९०००८३७०




Comments
Post a Comment