काळाच्या पडद्याआड गेलेली ऐतिहासिक भिल्लीणिची वाट अर्थात नांगरदरा घाटवाटा..
सन २०१७/१८ मध्ये नांगरदरा घाटवाटे बाबत एका what's up ग्रुप वर कुणीतरी विषय छेडला होता. ग्रुप कुठला होता मला आता स्पष्ट आठवत नाही व तेव्हा कुणीतरी फोन करून मला याबाबत विचारणा पण केली होती त्यांचे नाव पण नाव आठवत नाही. तेव्हापासून जुन्नर तालुक्यातील या घाटवाटे बाबत मी माहीती घेण्यासाठी खुपच धडपड केली होती खरी, परंतु कुठेही सुगावा लागेनासा झाला होता. खडकुंबे, फांगुळगव्हाण, घाटघर, अंजनावळे परीसरातील बहुतांशी बुजुर्ग मंडळींची व गुराख्यांची भेट घेत याबाबत विचारणा केली परंतु शेवटी माझे प्रयत्न असफलच ठरले. शेवटी हार न मानता याबाबत काही धागेदोरे प्रत्यक्ष भटकंती द्वारे हाती लागतात का पाहण्यासाठी ६/७ वेळा अंजनावळे डोंगर माथ्यावर एकट्याने जाऊन शोध घेण्याचा खुप प्रयत्न केला. मुरबाड तालुक्यातील गावातील जंगल तुडवत ही घाटवाट शोधन सोपं नव्हतं कारण या घाटवाटेची तळातुन सुरुवात सापडणं शक्यच नव्हते व काळाच्या ओघात ती गाडली गेली असणार यात शंकाच नव्हती म्हणून डोंगर घाट माथ्यावरून एखादी घळ खाली पोहचते का हा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी डों...